350 सोन्याच्या होनांनी होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा, संभाजीराजेंची माहिती..


रायगड : यावर्षी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय भव्यदिव्य साजरा करण्यात येणार आहे. यामुळे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुर्गराज रायगडावर शिवरायांचा ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला.

हा सोहळा जगभर साजरा व्हावा यासाठी यंदाचा ३५० वा राज्याभिषेक जल्लोषात आणि मोठ्या थाटात होणार आहे. गडावर ५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत व शिवभक्तांच्या समवेत नाणे दरवाजा येथून गड चढण्यास प्रारंभ होणार आहे.

नंतर २१ गावातील सरपंच व पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या हस्ते होणार आहे. सोन्याचे होन तयार करण्याचा मान चंदुकाका सराफ ॲन्ड सराफ प्रा. लि. कंपनीला देण्यात आला आहे.

धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, जागर शिवशाहीरांचा. स्वराज्याच्या इतिहासाचा’, सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आहे, तसेच ३५० सोन्याच्या होनने शिवराज्याभिषेक होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!