शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा २२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी होणार जमा…


पुणे : देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याकडे लक्ष ठेवून आहेत. २२ व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही शेतकऱ्यांना एकरकमी चार हजार रुपये मिळण्याचीही चर्चा आहे.

केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या योजनेअंतर्गत दरवर्षी एकूण ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान टप्प्यांमध्ये, साधारण चार महिन्यांच्या अंतराने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत २१ हप्ते वितरित करण्यात आले असून, शेवटचा म्हणजे २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता.

त्यामुळे आता पुढील म्हणजे २२ व्या हप्त्याची उत्सुकता वाढली आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ दरम्यान करण्यात आली होती. त्या वेळी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून पीयूष गोयल यांनी याची घोषणा केली होती आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेची अंमलबजावणी सुरू झाली.

थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचा अवलंब करणारी ही जगातील सर्वात मोठी योजना म्हणून ओळखली जाते.अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार २४ फेब्रुवारी २०२६ रोजी २२ वा हप्ता वितरित होऊ शकतो, मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केलेली नाही किंवा भू-सत्यापनाची प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे, त्यांना हा हप्ता मिळू शकणार नाही. तसेच बँक खात्याचा चुकीचा तपशील, IFSC कोडमध्ये त्रुटी, नावाच्या स्पेलिंगमधील चुका किंवा आधार क्रमांकातील अचूकता नसल्यास रक्कम जमा होण्यास अडथळा येऊ शकतो. या त्रुटी दुरुस्त केल्याशिवाय संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात २२ वा हप्ता जमा होणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!