काय सांगता! ज्योतिषाकडून मुहूर्त काढून चोरी, बारामतीमधील ‘त्या’ चोरीचा तपास अखेर लागला, ५ जणांना बेड्या…


बारामती : चार महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा बारामती पोलिसांनी लावला आहे. विशेष म्हणजे ही चोरी ज्योतिषाकडून मुहूर्त काढून करण्यात आली होती असे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सचिन अशोक जगधने, रायबा तानाजी चव्हाण, रवींद्र शिवाजी भोसले, दुर्योधन धनाजी जाधव आणि नितीन अर्जुन मोरे यांना याप्रकरणी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देवकातेनगर येथे तृप्ती सागर गोफणे या त्यांच्या लहान मुलांसह घरात असताना चार अनोळखी चोरट्यांनी घराच्या कंपाऊंड भिंतीवरुन आत प्रवेश केला. तृप्ती गोफणे यांना मारहाण करुन त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानंतर घरातील एक कोटी सात लाख २४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

महिलेचे यांचे हातपाय बांधून रात्रीच्या आठ वाजता दरोडेखोराने तब्बल ९५ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम, वीस तोळे वजनाचे ११ लाख ५९ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रुपयांचे तीन मोबाईल असा एकूण एक कोटी सात लाख २४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता.

तृप्ती यांचे पती सागर गोफणे हे जमीन विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती सचिन जगधने याला मिळाली होती. त्यानंतर गुन्ह्याचा कट रचना हा गुण्याचा कट करण्यापूर्वी आरोपींनी रामचंद्र वामन चव्हाण हा फलटण तालुक्यातील आंदरुड येथील ज्योतिषी असून त्याच्याकडून गुन्हा करण्यासाठी मुहूर्त काढून त्याच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा केला अशी माहिती देखील यामधून मिळाली.

आतापर्यंत संबंधित आरोपींकडून ७६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये ६० लाख ९७ हजार रुपयांची रोकड, १५ लाख ३५ हजार ४१० रुपयांचे २६ तोळे सोने जप्त करण्यात आलेले आहेत.

तब्बल चार महिन्यानंतर ही चोरी उघडकीस आली असून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चोरीसाठी ज्योतिषाकडून मुहूर्त काढला गेला होता अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. हा दरोडा घालणारे गुन्हेगार हे एमआयडीसीतील मजूर कामगार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!