Thane Crime : पिशवीत लघुशंका करून त्यातूनच ग्राहकांना फळविक्री, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ व्हायरल…


Thane Crime : डोंबिवलीतील एका धक्कादायक प्रकारानं संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला आहे. एका फळ विक्रेत्याच्या घृणास्पद कृत्यानं डोंबिवलीकरांची झोप उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर डोंबिवलीतील फळ विक्रेत्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये फळ विक्रेता एका प्लास्टिकच्या पिशवीत लघुशंका करताना दिसत आहे. एवढंच नाहीतर, त्यानंतर तो हात न धुता, त्याच हातांनी ग्राहकांना फळे विकताना दिसत आहे. फळ विक्रेत्याच्या घृणास्पद कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ग्राहकांना फळे देण्यासाठीच्या प्लास्टिक पिशवीत लघुशंका करुन विक्रेत्याने याच पिशव्या गुप्त भागातून काढून त्यातून ग्राहकांना फळे देण्याचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे बजरंग दल आक्रमक झाले आहे. सणाच्या काळात हिंदू ग्राहकांच्या भावनांशी खेळणाऱ्या या फळ विक्रेत्याला बेदम चोप देत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलिसाच्या हवाली केले आहे. Thane Crime

तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रकरण चर्चेत असतानाच डोंबिवली पलावा सिटीमधील एका फळ विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक फळ विक्रेता आपल्या गुप्त भागात लपवलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर काढताना दिसतो. ग्राहकांना फळे भरून देण्यासाठी या पिशव्या वापरत असल्याचे दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!