ठाकरे गटातील १५ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार ; अदित्य ठाकरेंना शिंदे व्हिप मान्य करावा लागणार ?
मुंबई : शिवसेना नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाचे आमदार अडचणीत सापडले आहेत.
आता ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ठाकरे गटाचे 15 आमदार अपात्र ठरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच आता आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा व्हिप स्वीकारावा लागणार का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ठाकरे गटातील 15 आमदारांना करणे दाखवा नोटीस जारी केली होती. शिवाय विधानसभा अध्यक्षही या गटाचेच आहेत, त्यामुळे आता येत्या विधीमंडळ अधिवेशनात ठाकरे गटातील 15 आमदारांसंदर्भात शिंदे गटाकडून कोणती रणनीती आखली जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Views:
[jp_post_view]