ठाकरेंची मुंबईत खेळी! किशोरी पेडणेकरांचा केसाने गळा कापला ; भाजप नेत्याचा वार…


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध वैधानिक समित्यांच्या निवडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या महानगरपालिकेच्या स्थायी समितीतून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना वगळण्यात आले आहे. त्यावरून मनसे नेते संतोष धुरी यांनी उद्धव ठाकरे आणि उबाठा गटावर जोरदार टीका केली आहे. ठाकरेनीं किशोरी ताईंचा केसाने गळा कापला गेला आहे, असे खळबळजनक वक्तव्य संतोष धुरी यांनी केले आहे.

शिवसेना ठाकरे गटाने आपल्या गटनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना स्थायी समितीपासून दूर ठेवले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता भाजप नेते संतोष धुरी यांनी याप्रकरणी टीका केली आहे. हा मातोश्रीचा प्लॅन आहे की अज्ञान, हे आता स्पष्ट झाले असून किशोरी ताईंचा केसाने गळा कापला गेला असल्याच त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले,यावर किशोरी पेडणेकर नक्कीच नाराज असणार आहे. तुमचा केसांनी गळा कापला आहे. त्यांच्याकडे फक्त सभागृहापुरतेच पद उरले आहे. प्रत्येक समितीवर विशिष्ट गॉडफादरमुळे त्यांची वर्णी लागत होती, पण आता इतर वरिष्ठ नगरसेवकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे मातोश्रीला समजले आहे, असेही संतोष धुरी म्हणाले.

दरम्यान सर्व घडामोडींमुळे किशोरी पेडणेकर यांचे पक्षात आणि पालिकेत असलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!