ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक संपन्न; राज-उद्धव एकत्र येण्याबाबत काय चर्चा?, किशोरी पेडणेकरांनी सांगितली आतली बातमी…


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. यावर मनसेकडून देखील भाष्य करण्यात आले.

राज्याच्या हितासाठी दोघांनी एकत्र यावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर किशोरी पेडणेकरांनी मोठे विधान केले आहे. यादरम्यान आज ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये युतीबाबत कोणती चर्चा झाली का? याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलं आहे. राज्यात सुरू असलेल्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एकत्रिकरणाबाबत काही चर्चा झाली का? याबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, अजिबात या मुद्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. फक्त नागरिकांच्या मुद्यावर बोलले.

किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, आजच्या मातोश्रीवरील बैठकीमध्ये मनसेसोबतच्या युतीबद्दल कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाहीये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर बोलताना पेडणेकरांनी म्हटले की, मला मनातून चांगले वाटत आहे. पण दोन्ही पक्षप्रमुख, जे दोघे भाऊ आहेत आणि नात्या बांधलेले आहेत, ते निर्णय घेतील. दोन्हीकडील जे कार्यकर्त्ये आहेत, त्यांचेही चांगल्याप्रकारे मनोमिल होईल.

यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, आदित्य ठाकरेंना टार्गेट केले जात आहे. अदानीला दिलेले भूखंड आणि श्रीखंड यावर कोणीही बोलत नाही. लोकांना कळून चुकलेले आहे की, आदित्यला का टार्गेट केले जात आहे. कारण आज आदित्यसारखे नेतृत्व शिवसेनेकडे आहे आणि त्या नेतृत्वावा डिच केलं तर आपल्याला जे साध्य करायचे ते होऊ शकतं. मुळात म्हणजे जे आरोपी आहेत, त्यांना शिक्षा करा.

दरम्यान, काल मी उपमुख्यमंत्र्यांचे पण ऐकले दुध का दुध पाणी का पाणी करेंगे…म्हटले. अरे किती वेळा करणार पण उत्तर देता का? असेही किशोरी पेडणेकरांनी म्हटले आहे. आजच्या बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा ही मनसेसोबच्या युतीबद्दल झाली नसल्याची पेडणेकरांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!