ठाकरेंची मुलुख मैदान तोफ असणाऱ्या सुषमा अंधारेंची प्रकृती बिघडली; मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांची प्रकृती आज अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आल आहे. मात्र उद्या होणाऱ्या हक्कभंग समितीच्य कारवाईसाठी त्या उपस्थित राहणार नसल्याची माहिती देखील हाती आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखी खाली सध्या उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान सुषमा अंधारे आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात विधानपरिषदेच्या हक्कभंग समितीने कारवाई सुरू केली होती.
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीनंतर मागील काही महिन्यांपासून सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा हे समितीसमोर हजेरी लावत आहेत.हक्कभंग समितीची उद्या गुरूवारी देखील सुनावणी होणार आहे. परंतु सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आलं आहे.

दरम्यान उपचारासाठी मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल असल्याने त्या उद्या होणाऱ्या हक्कभंग समितीच्य कारवाईसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती हाती आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून विधीमंडळाला पत्र पाठवण्यात येणार आहे.