ठाकरेंची मुलुख मैदान तोफ पुन्हा शिवसेनेवर नाराज ; झेडपीच्या निवडणुकीच्या तोंडावर केलेल वक्तव्य चर्चेत


मुंबई : महापालिका निवडणुकानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाची मुलूख मैदानी तोफ, आमदार भास्कर जाधव पक्षावर पुन्हा नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उद्याण आलं आहे.

आमदार भास्कर जाधव म्हणाले,शिवसेनेसंबंधी जिल्ह्यातले मला माहिती नाही पण माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समितीमध्ये मी सर्व जागा जिंकेन,माझ्या तालुक्यापुरते मला माहिती आहे, जिल्ह्याचे माहिती नाही, असे म्हणत पक्षावर त्यांची नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांचे विधान राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

आमदार भास्कर जाधव यांचा जिल्ह्यातील निवडणुकांकडे काना डोळा होत आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे.दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भास्कर जाधव यांचा केवळ त्यांच्या मतदार संघावर फोकस आहे. भाजपकडून आतापर्यंत पक्ष फोडून झाले, मतदार याद्यात घोळ सुरू आहेत. भरमसाठ पैशांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा त्यांचा फंडा आहे. मात्र आमच्याकडे प्रचंड जनशक्ती आहे. धनशक्तीसमोर जनशक्ती भारी पडेल असा मला विश्वास आहे असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भास्कर जाधव यांनी राज्यातील राजकीय परिस्थिवरही भाष्य करणे टाळलं आहे. आता पक्ष संबंधित यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!