ठाकरेंच्या गटाचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान…!
शिवसेना भवनवरही शिंदे गटाचा दावा
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना मानून त्यांना ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंच्या गटाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर शिवसेनेच्या गटाच्या याचिकेची लवकर सुनावणी करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र खंडपीठाने आदेश देण्यास नकार दिला.
दुसरीकडे शिवसेनेचे (शिंदे गट) भरत गोगावले म्हणाले- ‘आम्ही सभापतींना नोटीस दिली आहे. आम्ही ECI आदेशाचे पालन करत आहोत. पुढे कसे जायचे याचा विचार करू. ईसीआयने आम्हाला शिवसेना म्हणून मान्यता दिल्याने हे कार्यालय आता आमचे आहे.
Views:
[jp_post_view]