ठाकरेंची 25 वर्षाची सत्ता निसटली ; मुंबईतील पराभवानंतर संजय राऊतांचा सरकारवर जोरदार वार..


मुंबई : सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. गेली 25 वर्षे सत्ता असलेल्या ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. या सर्व निकालांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार वार केला आहे.

संजय राऊत म्हणाले, आमच्या हातामध्ये सत्ता आणि एवढा पैसा असता, तर भाजपलासुद्धा देश टिकवता येणार नाही. फडणवीसांना मुख्यमंत्री पद टिकवता येणार नाही. आणि एकनाथ शिंदेनां त्यांचं जे पद आहे ना, ते टिकवता येणार नाही ” अशा शब्दांत राऊतांनी सुनावलं आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. तब्बल 29 महापालिका पैकी 24 महापालिकेवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई म्हणजे ठाकरे हे कधी काळीपासून समीकरण होतं. यंदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरें एकत्र आले होते मात्र त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. भाजप – शिंदेंशी शिवसेना यांनी बाजी मारली.

मुंबईतील सत्ता हातून निसटल्यानंतर ठाकरे ब्रँड संपला अशी चर्चा होती मात्र या निकालामध्ये उद्धव ठाकरे यांना 65 जागा मिळाल्या आहेत तर राज ठाकरेंना सहा जागा मिळाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यावर राऊत यांनी बोलताना म्हणाले,मुळात हा पराभव आहे असं आम्ही मानत नाही, आम्ही चांगली लढत दिली, आघाडी घेतली. मनसेला आणखी 10-12 जागा मिळणं अपेक्षित होतं असं त्यांनी म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!