मोठी बातमी! ठाकरे-शिंदे एकत्र येणार, भाजपची करणार कोंडी, कुठं झाला निर्णय?, महत्वाची माहिती आली समोर..


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत असून राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड घडली आहे.

शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड कोकणात झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणणारी घडामोड कणकवलीत उभी राहिली आहे.

शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. ही बैठक ‘शहर विकास आघाडी’ च्या माध्यमातून कणकवलीत भाजपविरोधात आणि राणेंविरोधात आघाडी निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे

भाजपने सिंधुदुर्गात स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यानंतर शिवसेनेचे दोन्ही गट ठाकरे गट आणि शिंदे गट स्थानिक पातळीवर एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत दिसत आहेत. कणकवली नगर पंचायत अध्यक्षपदासाठी भाजपकडून समीर नलावडे इच्छुक आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडी आणि शिंदेसेना हातमिळवणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!