लाडक्या बहिणीसाठी ठाकरेंनीं केली मोठी मागणी ; पुढच्या सहा महिन्यांचे हफ्ते….

पुणे: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ई केवायसी करणे बंधनकारक आहे. या योजनेतील गैरप्रकार, फसवणूक थांबवण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच आता या लाडक्या बहिणीसाठी ठाकरें गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी मागणी केली आहे. लाडक्या बहिणींना पुढचे सहा महिन्याचे हप्ते द्या, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या मागणीची सरकार दखल घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीआधी सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली. निवडणुकीच्या वेळी दोन-तीन वेळचे हप्ते लाडक्या बहिणींना दिले होते. तसे आता सहा महिन्याची हप्ते द्या असे ठाकरेंनीं म्हटलं आहे. सद्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील इतरही भागांना मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेले आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक चक्क पाण्यामुळे संपून गेले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने लाडक्या बहिणींना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी केली आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी.तसेच सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. हातातून पीक गेलेले असताना त्यांच्याकडून कर्जवसुली केली जात आहे, हा प्रकार थांबवावा असेही यावेळी ठाकरे म्हणाले.तसेच सरकारने लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचा लाभ अगोदरच देऊन टाकावा. सरकारने निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने दोन ते तीन महिन्यांचे पैसे अगोदरच दिली होते, तसेच पैसे यावेळीदेखील द्यावेत. या पैशांतून लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना अशा स्थितीत आर्थिक मदत मिळेल, अशी मोठी मागणी ठाकरेंनी केली.
