ठाकरे गटाचे संजय राऊत पुन्हा’ शिवतीर्थ’ वर, नेमकी कशावर चर्चा; युती होणार?


पुणे:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विशेषतः बीएमसी निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीमागचा मुख्य उद्देश शिवसेना ठाकरें गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती आणि जागावाटपाचा तिढा सोडवणे हा आहे. संजय राऊत यांच्या भेटीवेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई देखील उपस्थित होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सुरज चव्हाण हे जागावाटपाच्या बोलणीत सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील बहुतांश ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप सुरळीत झाले असले तरी, काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये अजूनही पेच कायम आहे.

       

दरम्यान गेल्या काही दिवसापासून युतीची चर्चा सुरू असताना माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडुप यांसारख्या मराठी भाषिक बहुल मतदारसंघांमध्ये जागावाटपाचा मुद्दा अजूनही अडकलेला आहे. आता ठाकरे आणि मनसे यांची युती होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!