ठाकरे गटाचा बंडखोरांना दणका ; ‘या ‘कारणामुळे तब्बल 26 नेत्यांची हकालपट्टी, नावासह यादी समोर

पुणे : राज्यातील 29 महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू झाली असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत.या पक्षाने शिस्तीचा कडक बडगा उगारला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीतही माघार न घेता, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे करणाऱ्या २६ प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आलेले पदाधिकारी कोण?
संदीप मोरे, मंदार मोरे, शेखर वायंगणकर, कमलाकर नाईक, परशुराम (छोटू) देसाई, विजय इंदुलकर, दिव्या बडवे,सोनाली म्हात्रे, संगीता गोसावी, नीता शितोळे,रोहिदास ढेरंगे, सदाशिव बालगुडे, विकी मोरे,आनंद इंगळे, विजय नागावकर, रोहित खैरे, गणेश खाडे,गणेश सोनवणे, चेतन सूर्यवंशी, माधुरी गायकवाड, कमलेश वारीया, बाबू कोळी, रोहित देशमुख, मंगेश बनसोड,नयना देहेरकर, आरती लोणकर, प्रवीण कोलाबकर

दरम्यान आगामी निवडणुकीसाठी मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती आहे. काही जागा मित्रपक्षांना सुटल्या आहेत. तिथेही शिवसेनेच्या काही लोकांनी बंडखोरी केली आहे. ज्यामुळे युतीमध्ये बिघाडी होऊ नये म्हणून ही पक्षाने कारवाई केली आहे.

या कारवाईत मुंबईतील प्रभाग क्र. ९५ मधील शेखर वायंगणकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहेत. वायंगणकर हे पक्षाचे विधान परिषद आमदार आणि ज्येष्ठ नेते अनिल परब यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
