दौंड शहरातील रस्त्यावर कोयता घेऊन दहशत; दोन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, घटनेने उडाली खळबळ..
दौंड : दौंड शहरातील सिद्धार्थनगर येथे हातात धारदार कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना दौंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राकेश टिळक जगताप ( वय. २८) व सचिन सुरेश नलावडे (वय ३०, दोन्ही रा.वडारगल्ली ता-दौंड जि-पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी (ता.७) शहरातील सिद्धार्थ नगर येथे मोटार सायकलवरुन दोघेजण हातामध्ये धारदार कोयता घेवुन फिरत आहेत अशी माहीती पोलीसांना मिळाली.
दौंड शहरातील रस्त्यावर कोयता घेऊन दहशत; दोन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.. pic.twitter.com/TOQI0dxmRT
— Time2time News (@NewsTime2time) August 8, 2023
पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीसांनी माहिती मिळाल्यावर ठिकाणी गेले असता, त्या ठिकाणी दोघेजण हातात कोयता घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले, या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अक्षय घोडके यांनी याप्रकरणी फिर्याद दिल्याने त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यात मध्यंतरी कोयता गॅंगने धुमाकूळ घातला होता. वाहने, दुकानांची तोडफोड, भरचौकात दहशत यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावर पोलिसांनी कारवाईला जोरदार सुरुवातही केली होती. पण आता पुन्हा कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे