साताऱ्यात दरोडेखोरांची दहशत ; चालत्या कारमध्ये सराफाला लुटले

पुणे : गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यात दरोडेखोरांची दहशत दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर शनिवारी मध्यरात्री कामोठे मुंबई येथून विटा (जि. सांगली ) कडे निघालेल्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यास दरोडेखोरांनी चालत्या कारमध्ये लुटल्याने भुईज पोलीस ठाण्यासह सातारा जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री कामोठे मुंबई येथून विटा या गावाकडे निघालेल्या कारला पाठीमागून आलेल्या इनोवा स्कार्पियो मधील सात ते सात लोकांनी कारच्या काचा फोडून कार ताब्यात घेतली. त्यामधील तीन जणांना गावच्या हद्दीत सोडून त्यांचे हातपाय बांधले. व कारमधून वीस लाख रुपये घेऊन चोरटे पळून गेले. घटनास्थळी भुईज पोलिसांनी भेट देत तातडीने तपास व पाटलाकडून शोध मोहीम राबवली. त्याचबरोबर शनिवारी सायंकाळपर्यंत चौकशी करून विविध पथके संशयीतांचा माग घेण्यासाठी रवाना केली. या प्रकारानंतर भुईज पोलिस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी भेट देऊन तपासासाठी सूचना व मार्गदर्शन केले.
दरम्यान रात्री उशिरापर्यंत हा गुन्हा भुईज पोलिस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रमेश गरजे,फौजदार पतंग पाटील,सुरत शिंदे करत आहेत.
