पुण्यात कोयता गॅंगची दहशत ; किरकोळ कारणावरून पेटला वाद, चौघे आले अन मेडिकल दुकानात तोडफोड..


पुणे : विद्येच माहेरघर अशी ओळख असलेले पुणे आता गुन्हेगारी घटनांमुळे चांगले चर्चेत आले आहे. काही दिवसापासून अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी ही अधिक वाढत चालली आहे.अशातच आता पुण्यात एका किरकोळ वादातून मेडिकल दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच, या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भवानी पेठ परिसरातील काशेवाडी भागात 17 ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता मेडिकल दुकानात कोयत्याने तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. दुकानासमोर काही तरुणांनी दुचाकी उभी केली होती. दुकानदाराने गाडी हटवण्यास सांगितले असता त्यांच्यात वाद झाला. या किरकोळ कारणावरून संतापलेल्या चार जणांच्या टोळक्याने मेडिकलमध्ये घुसून प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. त्यानंतर धारदार शस्त्रांनी काचेच्या काउंटरवर वार करत दुकानातील मालाची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन असून सध्या फरार आहेत. फिर्यादीच्या मते, “दुकानासमोर गाडी लावू नको” एवढे सांगितल्यामुळे आरोपींनी रागाच्या भरात हा हल्ला केल्याची माहिती आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!