पुणे-नाशिक महामार्गावर गुंडांची दहशत ; एसटी चालकासह कंडक्टरवर तरुणांचा हल्ला

पुणे : गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात गुंडगिरीची दहशत वाढताना दिसत आहे. अशातच आता पुणे -नाशिक महामार्गावर थार गाडीतील तरुणांनी गाडी अडवून एसटी चालक व कंडक्टरवर हल्ला केली असल्याची माहिती समोर आली आहे. या गावगुंडावर तात्काळ पोलिस कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर खेड ते मंचर दरम्यान एसटी बस धावत होती. यादरम्यान काही तरुणांच्या थार गाडीने या बसचा रस्ता अडवला. गाडी बसच्या समोर आडवी लावून गाडीतील तरुण एसटीमध्ये घुसले. यानंतर चालकाने बस चालू केली असतात या तरुणांनी चालकालाच चालू बसमध्ये मारहाण केली.या मारहाणीदरम्यान प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. मारहाण सुरु असताना प्रवाशांपैकी असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने मारहाण थांबवण्यास सांगितली. मात्र त्यांच्या विंनतीला न घाबरता या गुंडांनी चालकाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ड्रायव्हरला मारहाण करणं म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ असं म्हटलं जात आहे.

दरम्यान या तरुणांनी फक्त बस चालकाला मारहाण न करता कंडक्टरवर देखील हल्ला केला आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पण ही गुंडगिरी प्रवाशांमध्ये दहशत पसरवत आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली असून, पोलिस कारवाईची मागणी जोर धरत आहे.

