भयंकर! पाच वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले, नंतर प्रतिभाला संपवून फ्रीजमध्ये ठेवलं, १० महिन्यांनी सगळंच उघड झालं…


नवी दिल्ली : एका बंद घरात ठेवलेल्या फ्रिजमध्ये महिलेचा सडलेला मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील देवास येथे घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, देवास शहरातील बायपास रोडवर असलेल्या वृंदावन धाम कॉलनीत शुक्रवारी (१० जानेवारी) सकाळी भाडेकरू बलवीर सिंग यांनी बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. यानंतर बँक नोट प्रेस पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्याची दार उघडलं. तेव्हा घरातून तीव्र दुर्गंधी येत होती. या घरात एक फ्रीज होता. पोलिसांनी फ्रीज उघडून पाहिला असता त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

त्यानंतर एफएसएल टीमने घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले. बुधवारी रात्री बलवीरने या बंद घराचे कुलूप तोडून कुटुंबासह खोल्यांची साफसफाई केली होती. तेव्हा त्याने फ्रिज बंद केली. त्यानंतर या फ्रिजमधून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याचा साथीदार दुसऱ्या गुन्ह्यात राजस्थान कारागृहात कैद आहे. त्याला पोलिस कोठडीत घेण्याची तयारी सुरू आहे.

तसेच संजय पाटीदारने घर सोडल्यानंतर जुलै महिन्यापासून बलवीर सिंग राजपूत आपल्या कुटुंबासह या घरात भाड्याने राहत होते. पाटीदारने या घरातील दोन खोल्यांना कुलूप लावून ठेवले होते. बुधवारी रात्री बलवीरने या खोल्या उघडून स्वच्छ करून फ्रिज बंद केला. शुक्रवारी (१० जानेवारी) सकाळी पुन्हा एकदा खोली उघडली असता, त्यातून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

बलवीरच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली. तपासादरम्यान असे आढळून आले की, बलवीरच्या आधी उज्जैन जिल्ह्यातील इंगोरिया पोलीस स्टेशन परिसरात राहणारा संजय पाटीदार या घरात राहत होता. प्रतिभा उर्फ पिंकी ही संजयसोबत राहत होती. मार्च २०२४ पासून प्रतिभाला कोणीही पाहिले नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. संजयने सांगितलं होतं की प्रतिभा तिच्या माहेरी गेली आहे. याची माहिती मिळताच एएसपी जयवीर भदौरिया यांच्यासह एक पथक संजयला अटक करण्यासाठी उज्जैनला पोहोचले.

अटक केल्यानंतर संजयने सारंकाही सांगितलं, तो प्रतिभासोबत पाच वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. प्रतिभाला तीन वर्षे उज्जैनमध्ये ठेवल्यानंतर दोन वर्षांपूर्वी ते देवास येथे राहत होते. जानेवारी २०२४ पासून प्रतिभाने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लागला होता.

पण, संजय आधीच विवाहित होता. त्यामुळे त्याने मित्र विनोद दवे याच्यासोबत तिचा खून करण्याचा कट रचला. मार्च महिन्यात प्रतिभाचा भाड्याच्या घरात गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. फ्रिज कापडाने झाकून ठेवला होता. जेणेकरुन कोणी तो उघडून पाहू नये. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!