राज्यात उष्णतेची लाट! 12 ते 5 घराबाहेर पडू नका, राज्यातील तब्बल तीन जिल्ह्यांमध्ये भयंकर परिस्थिती…


पुणे : मार्च महिना संपत असताना राज्यात हवामानाचा दुहेरी चेहरा पाहायला मिळत आहे. मराठवाड्यासह काही भागांत कडाक्याचं ऊन पडत असताना, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

भारतीय हवामान विभागने उष्णतेबाबत महत्त्वाचा इशारा देत आज उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. उष्णता आणि दमट वातावरणामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

विशेषतः दुपारी 12 ते 5 या वेळेत घराबाहेर पडणं टाळावं, कारण या काळात उन्हाचा कडाका अधिक तीव्र असणार आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावं लागल्यास टोपी, रूमाल आणि पाण्याची बाटली सोबत ठेवावी, असंही सांगण्यात आलं आहे.

राज्यात एका भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असताना, दुसऱ्या भागात उष्णता आणि दमट वातावरणाचा त्रास वाढणार असल्याने आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे.

मार्च महिन्यातच उन्हाचा चटका वाढल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागने आज ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी उष्णता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईमध्ये सोमवारी तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याची नोंद करण्यात आली आहे.

आज तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभागकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच दमट वातावरणही राहणार असल्याने उकाडा अधिक जाणवणार आहे.

अशा परिस्थितीत 38 अंश तापमानात घराबाहेर पडणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. उन्ह लागणे, डिहायड्रेशन यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळावं.

अत्यावश्यक कारणासाठी बाहेर जावं लागल्यास पाण्याची बाटली सोबत ठेवणं, डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरणं आणि थेट उन्हात दीर्घकाळ न राहणं, अशा उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!