समृ्द्धी महामार्गावर भीषण अपघात ; धावत्या कारचा टायर फुटला, एकाच कुटुंबातील…,

मुंबई : समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भयंकर अपघात झाला आहे.भरधाव वेगाने जात असलेल्या कारचा टायर फुटल्यामुळे कारवर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा अपघाताचा सापळा बनला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,कारचा टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समृद्धी महामार्गावर ही घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. घटना घडल्यानंतर स्थानिक लोक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातापूर्वीचा व्हिडीओ समोर आला असून त्यात बुकाणे आणि घुसळे कुटुंबीय आनंदात दिसत होते. या अपघातामुळे त्या आनंदाच्या क्षणांमध्ये काही क्षणांतच दुःख आणि हाहाकार पसरला आहे. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांवर या घटनेने मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान मृतांचा संबंध कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा येथील कुटुंबाशी आहे. मृतांमध्ये निलेश बुकाणे, त्यांची सख्खी बहीण वैशाली सचिन घुसळे आणि निलेश बुकाणे यांच्या पत्नी छाया बुकाणे यांचा समावेश आहे.अपघातात अनेक जखमी झाले आहेत,ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे.
