लोणावळ्यातील लाइन्स पॉईंटजवळ भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू ,कारचा चक्काचूर

पुणे : लोणावळा येथील टायगर पॉईंटजवळ भरधाव डंपर आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आणि कारमध्ये असलेल्या दोन्ही पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील टायगर पाईंटजवळील रस्त्यावर भीषण अपघात झाला. गोवा येथून काही पर्यटक कारने लोणावळ्यात आले होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली. कारचा वेग जात असल्याने धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. लोणावळ्यातून सहारा सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवलिंग पॉईंट येथे ही अपघाताची घटना घडली.या अपघातात कारचालक योगेश सुतार (२१ वर्षे) आणि मयूर वेंगुळकर (२४ वर्षे) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण गोव्याच्या म्हापसा येथील राहणारे होते. या अपघातामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक दिनेश तायडे करत आहेत. दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

