पुण्यात भीषण अपघात ; टँकरची दुचाकीला जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यातील सासवड-नारायणपूर मार्गावरील भिवडी येथे चौधरी वस्तीजवळ एका डिझेल टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या धडकेमध्ये दुचाकीचा चुराडा झाला आणि दुकाचीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी टँकरचालक हरिबा टोणे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार नंदू होले (वय २२ वर्षे) आणि अपूर्वा कुंभारकर (वय २३ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.कापूरहोळ येथून सासवडच्या दिशेने डिझेल वाहून नेणाऱ्या टँकरने ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या दुचाकीला समोरुन धडक मारली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले. सुमीत होले यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर टँकरचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान धडक इतक्या जोरात झाली, की ट्रँकरच्या पुढच्या भागात दुचाकी अडकली आणि तिला पार चुराडा झाला.
