वळती येथे ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात! शिंदवणे येथील चालकाचा मृत्यू, एकजण जखमी….

उरुळी कांचन : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच अपघाताची घटना समोर आली आहे. शेताच्या बांधावरून घरी जाताना ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात शिंदवणे (ता. हवेली) येथील चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

तर या अपघातात आणखी एकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. वळती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. 11) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
बाबू महादेव डोलारे (वय-54, रा. शिंदवणे, ता. हवेली) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर गणेश सुभाष महाडिक (वय-21, व्यवसाय – शेती व ट्रान्सपोर्ट, रा. शिंदवणे वाक वस्ती, ता. हवेली) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश महाडिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मयत बाबू डोलारे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, मयत बाबू डोलारे हे ट्रॅक्टर क्रमांक MH 12 XX 3765 चालवत होते. दत्ता कुंजीर यांच्या शेताच्या बांधावरून ट्रॅक्टर नेत असताना त्यांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून ट्रॅक्टर वेगात व बेदरकारपणे चालविल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात डोलारे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात फिर्यादी गणेश महाडिक हे देखील जखमी झाले असून ट्रॅक्टरचेही मोठे नुकसान झाले आहे. आपले ताब्यातील ट्रैक्टर हा अविचाराने हायगयीने, बेकायदेशीरपणे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून ट्रैक्टर चालवुण स्वत: पलटी करुन लहान मोठ्या जखमा होवुन स्वत: च्या मृत्यूस कारणीभूत झाले.