जिल्हा परिषदेच्या संभाव्य उमेदवारांचे टेन्शन वाढलं, आता उमेदवारी अर्जांच्या अपिलाची तरतूद रद्द…

पुणे : राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी लवकरच कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयांच्या विरोधात उमेदवारांकडून करण्यात येत असलेल्या अपिलाबाबतची तरतूद रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
यामुळे इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे. यासाठी जिल्हा परिषद निवडणूक अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. याचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. या मागणीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आठवडाभरापूर्वीच राज्याच्या ग्रामविकास विभागाला पत्र दिले होते.
दरम्यान, या सुधारणेनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे पत्राद्वारे केलेली आयोगाची मागणी मान्य झाली आहे. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

दरम्यान, या नव्या नियमांमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असणार आहे. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२५ काढण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२५ काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीची अपिलाची तरतूदच रद्द करावी किंवा त्यात सुधारणा करावी, असे निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पाठविलेल्या लेखी पत्रात नमूद केले होते.
