महाराष्ट्रातील मंत्र्याचं टेन्शन वाढलं, सर्वचं मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट होणार, धाकधुक वाढली?

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट सुरू केले जाणार आहे. या ऑडीटला आतापासूनच सुरूवात झाली असल्यामुळे मंत्र्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या मंत्रिमंडळात कोणताही बदल न होता सध्या मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट करण्यात येणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी दिलासा असला तरी मंत्र्यांचे टेन्शन कायम डोक्यावर असणार आहे.त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वत:च्या मतदारसंघासोबतच पालकमंत्रिपद दिलेला जिल्हा या सर्वच ठिकाणी स्वत:ची ताकद आणि किमया मंत्र्यांना दाखवावी लागणार आहे. नाही तर या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार हे जवळपास निश्चत झाले आहे. सध्या फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ जवळपास पूर्ण होत आहे.

दरम्यान अडीच वर्षानंतर गुजरात सरकारमध्ये मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेत नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले. त्यानंतर लगेच महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने काही होणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मंत्र्यांना अडचणीला सामोरे जावे लागले होते. त्यातच एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला होता. त्यानंतर आता मंत्र्यांच ऑडिट घेतल जाणार असल्यामुळे मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.

