लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं ;’या ‘जिल्ह्यातील ३०,००० महिलांचे अर्ज बाद

पुणे :लाडकी बहीण योजनेवरुन सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. या योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी सरकारने लाडक्या बहिणींना ईकेवायसी करणे बंधनकारक केले आहे. या योजनेतील लाभार्थ्यांचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरु आहे. यातून आता तब्बल ३०,००० महिलांना बाद करण्यात आले आहे. बुलढाण्यातली महिलांचे अर्ज बाद केले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात आज एकूण 6 लाख 40 हजार 879 महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र, या महिलांची तपासणी करण्यात आली. विविध कारणांमुळे 30 हजार 304 महिलांचा लाभ रद्द करण्यात आला आहे. तर 390 महिलांनी आपला लाभ बंद करण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांना ईकेवायसी करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात येत आहे.त्यानुसार विविध जिल्ह्यातील महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. महिलांच्या अर्जांची तपासणी केली जात आहे. यातील अनेक महिला या निकषांमध्ये बसत नाहीत. त्यामुळे त्यांचे लाभ बंद केले आहेत.

दरम्यान आतापर्यंत या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. याचसोबत महिलांची केवायसी प्रोसेस सुरु आहे. यातून फक्त पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाईल.लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.

लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीला रजिस्ट्रेशनवेळी २ कोटी ६३ लाख ८३ हजार ५८९ अर्ज आले होते. यापैकी २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज स्विकारण्यात आले होते. यातील अनेक लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यात अनेक शासकीय कर्मचारी महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
