लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं ; ‘या’ जिल्ह्यातून २४ हजार महिला अपात्र..

पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोलाचा वाटा ठरला.आता या योजनेतील लाभार्थी महिलांना केवायसी अनिवार्य केली आहे. योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटचे ४ दिवस उरले आहेत. असे असतानाच आता लाडक्या बहिनींना मोठा धक्का बसला आहे.या योजनेतील अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातून २४ हजार महिलांचे अर्ज बाद झाले असल्याची माहिती समोर आली आहे.ठाणे जिल्ह्यातून जवळपास १४,६५,८७६ महिलांनी अर्ज केले होते. त्यातील १४ लाख ४१ हजार ७९८ अर्ज स्विकारले गेले होती. यामधील २४ हजार ७८ अर्ज बाद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आहे. जवळपास अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत ठाणे जिल्ह्यातून १४ लाख ६५ हजार ८७६ अर्ज दाखल झाले होते. त्यातील अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.यामधील २४ हजार ७८ अर्ज बाद करण्यात आले आहे दरम्यान,ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांची ईकेवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहेत.

लाडकी बहिणींना येत्या १८ नोव्हेंबरपर्यंत केवायसी करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करावेत.लाडकी बहीण योजना मागच्या वर्षी जून महिन्यात सुरु झाली होती. या योजनेत ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत होती. या योजनेत ऑक्टोबर २०२४ पर्यंत २.५६ कोटी महिलांने अर्ज केले होते. त्यातील महिलांची पडताळणी करण्यात आली. यातील लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

