भिगवणमध्ये तणावाचे वातावरण! आज गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप येणार, सकल हिंदू समाज आक्रमक…


भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. यामुळे एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आई व भावाच्या डोळ्यासमोर तरुणीला पळवून नेण्याचा व आई व भावाच्या डोळ्यात चटणी टाकून अपहरण करण्याचा थरारक प्रयत्न काल याठिकाणी झाला.

यामुळे भिगवण चा परिसर सध्या तणावपूर्ण आहे. याठिकाणी आज हिंदू संघटनांनी बंदची हाक दिली आहे. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप भिगवणमध्ये येणार आहेत. दौंड तालुक्यातील मुस्लिम अपहरणकर्ते असून अद्याप पर्यंत त्यांचा तपास लागलेला नाही. यामुळे सगळे आक्रमक आहेत.

पोलिसांची अनेक पथके त्यांच्या मार्गावर असून दुपारपर्यंत शोध न लागल्यास येथील सामाजिक वातावरण बिघडू शकते असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस याठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. आज आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप भिगवण मध्ये येणार आहेत.

आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भिगवणमध्ये पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला असून आज सकाळपासून भिगवण मधील सर्व दुकाने बंद आहेत. घटना घडल्यानंतर परिसरातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले होते. यावेळी परिसरात मोठ्या तणाव निर्माण झाला. याबाबत तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!