शिंदवणे घाटात टेम्पो , पिकअपचा समोरासमोर अपघात ! पिकअप पलटी होऊन चालक गंभीर जखमी !!


उरुळी कांचन : जेजुरी – उरुळी कांचन महामार्गावरील शिंदवणे घाटात – टेम्पो व पिकअप यांच्यात समोरासमोर अपघातात झाला असून पिकअप रस्त्यावर पलटी झाले आहे. या अपघातात पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी (ता. १८) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
अपघातग्रस्त पिकअप चालकाचे अद्याप समजू शकले नसून त्याला एका चारचाकीतून उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेली माहितीनुसार, पिकअप हे उरुळी कांचन बाजूकडून पाईप घेऊन जेजुरीकडे निघाले होते. तर टेम्पो हा जेजुरीकडून उरुळी कांचनच्या बाजूकडे निघाला होता. घाटात आला असता पिकअप व टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत पिकअप रस्त्यावरच पलटी झाले. यावेळी अपघातग्रस्त पिकअप चालकाला रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, या घटनेत त्याला दुखापत झाली असून त्याला रस्त्यावरून जाणाऱ्या एका चारचाकीतून उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची नागरिकांनी उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.