Tejas Thackeray : अनंत अंबानींच्या संगीत कार्यक्रमात तेजस ठाकरे यांचा डान्स, भाजप आमदाराची जोरदार टीका, म्हणाले नाच्या…
Tejas Thackeray : सध्या संपूर्ण देशात मुकेश अंबानी यांच्या लेकाच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. संगीत, हळद असे अनेक कार्यक्रम पार पडत असून राजकीय नेत्यांपासून बॉलीवूडकरांपर्यंत अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत. इतकच नव्हे तर ही मंडळी या सोहळ्यांना उपस्थित राहून ते सोहळे गाजवत देखील आहेत.
अंनत अंबानी आणि राधिका मर्चंट पार पडलेल्या संगीत सोहळ्यातही अनेकांचा विशेष अंदाज पाहायला मिळाला. पण या सगळ्यात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या नृत्याने साऱ्यांच लक्ष वेधून घेतले आहे.
पण तेजस ठाकरेंच्या या नृत्यावर सत्ताधाऱ्यांनी मात्र चांगलाच निशाणा साधला. त्यामुळे राजकीय वर्तुळातही तेजस ठाकरे यांचा डान्स हा चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तेजस ठाकरेंवर टीका केली आहे.
त्यांनी म्हटलं की, ‘अनंत अंबानीच्या लग्नात नाचणाऱ्या तेजस ठाकरेला आता नाच्या ठाकरे नाव द्यावं.’ त्यामुळे आता तेजस ठाकरेंचा डान्स हा राजकीय मुद्दा तर ठरत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाघ नखांवर इंद्रजित सावंत यांची पत्रकार परिषद पाहिली. जर महाविकास आघाडीच सरकार वाघ नखं आणत असतं, तर असाच विरोध त्यांनी केला असता का? हीच त्यांची भूमिका असती का?. इंद्रजित सावंत कोणासोबत बसतात उठतात हे सगळे आम्हाला माहित आहे.
महाराजांच्या किल्यावर दर्गे बांधले जातायत, हिरव्या चादरी चढवल्या जातायत त्यावेळी तुम्ही का बोलले नाही” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. शिवाजी महाराजांवर राजकारण करू नये. वाघ नखं येतायत त्याचं कौतुक करायला हवं. महाविकास आघाडीच्या काळात इंद्रजीत सावंत वळवळ करत बाहेर का आले नाही?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. Tejas Thackeray
रोहित पवार यांनी ड्रायव्हरची नोकरी सोडावी. अडीच वर्ष समृद्धी महामार्ग बाबत गप्प का होते?. पवार यांचा नातू आदानींचा ड्रायव्हर होतो. ठाकरेंचा नातू अंबानीच्या लग्नात नाचतो. एक नातू ड्रायव्हर दुसरा नातू नाच्या परत गुजरात्यांना शिव्या घालायच्या. याला आता नाच्या ठाकरे नाव द्यावं” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे.