पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात तहसीलदाराचा मोठा खुलासा; अनेकांची नावं समोर येणार, वरिष्ठांच्या दबावामुळेच…


पुणे : मुंढवा जमीन घोटाळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी चांगलीच अडचणीत सापडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. याप्रकरणी आता निलंबित तहसीलदार सुर्यकांत येवलेने मोठा खुलासा केला आहे. बाॅटेनिकल गार्डनला पत्र पाठविण्यासाठी वरिष्ठांचा दबाव असल्याचं त्यांनी कबूल केलं आहे.

मुंढवा येथील सर्व्हे क्रमांक ८८ याठिकाणी ४० एकर शासकीय जमीन सरकारने बाॅटेनिकल गार्डन यांना ५० वर्षाच्या करारावर दिली असून त्याची मुदत सन २०३८ पर्यंत आहे. मात्र, बाजारमूल्य १८०० काेटीची असलेली ही जागा मुळ महार वतनदार यांचे मालकीचे असून, त्यांचे पत्र आपल्याकडे असल्याचे सांगत शीतल तेजवानी हिने परस्पर या जागेची खरेदी भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायजेस या कंपनीशी ३०० काेटी रुपयात केला होता.

सदर जागा बाॅटेनिकल गार्डन यांनी खाली करावी यासाठी अमेडिया कंपनीने आपल्याशी पत्रव्यवहार केला असून, त्याचे पालन आपण करावे असे लेखी पत्र बाॅटेनिकल गार्डन यांना येवले यांनी पाठवलेले हाेते. त्यानुसार सुर्यकांत येवले यांच्यावर देखील गुन्हा दाखल असून त्यांची पुणे पाेलीसांचे आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल आठ ते दहा तास चाैकशी केली आहे. यामध्ये तहसीलदार यांनी आपल्यावर प्रशासनाताील वरिष्ठ अधिकारी यांचा दबाव असल्याने आपण हा पत्रव्यवहार केला असल्याची धक्कादायक बाब पाेलीसांना दिली आहे.

त्यामुळे आता या प्रकरणात नेमके केस दाखल करण्यासाठी काेणाचा दबाव हाेता हे समाेर येणे महत्वपूर्ण अाहे. तसेच सदर वरिष्ठ अधिकारी हा प्रशासनात प्रमुख पदावर कार्यरत असून त्याच्यावर सत्ताधारी एका वजनदार राजकीय नेत्याने दबाव टाकल्याची चर्चा पाेलीस खात्यात अंर्तगत रंगली आहे. त्यामुळे यामध्ये आता आणखीन कोणाची नावे समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

       

मुंढवा जमीन घोटाळ्यात प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर अद्यापही कारवाई न झाल्याने विरोधकांकडून टिकेची झोड उठवली जात आहे. आतापर्यंत शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे एक टक्का भागीदार असलेले द्विगविजय पाटील यांच्यावर कारवाई झाली आहे. तर इतरही सहआरोपींवर कारवाई झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!