दात होतील चमकदार, दुर्गंधी होईल दूर, ‘हे’ चार घरगुती उपाय लगेच करून पाहा..

पुणे : स्वच्छ दात असण्याने आपले स्मित तर सुंदर बनतेच पण आपल्या आरोग्यासाठी ते खूप महत्वाचे आहे. स्वच्छ दात केवळ किडनी आणि हृदयासारख्या अवयवांचेच संरक्षण करत नाहीत तर ते शरीरातील इतर अनेक समस्यांनाही प्रतिबंध करतात.
मात्र, योग्य काळजी न घेतल्यास दात पिवळे पडतात आणि किडही लागू शकते. यामुळे हसतानाही संकोच वाटतो. नियमित ब्रश केल्याने काही प्रमाणात फायदा होतो, पण काही नैसर्गिक उपाय करून तुम्ही तुमचे दात अधिक चमकदार आणि स्वच्छ ठेवू शकता..
संत्र्याची साल..
संत्र्याच्या सालीत नैसर्गिक ॲसिड आणि व्हिटॅमिन C असते, जे दातांसाठी फायदेशीर ठरते. संत्र्याची ताजी साल दातांवर घासल्याने दात स्वच्छ होतात आणि त्यांचा पांढरटपणा टिकून राहतो. हा उपाय दिवसातून दोन वेळा केल्यास दात अधिक चमकदार होतात.
नारळ तेलाचा उपयोग..
नारळाचं तेल ओइल पुलिंगसाठी उत्कृष्ट मानले जाते. चमचाभर नारळ तेल तोंडात घेऊन १५-२० मिनिटे धरावे आणि नंतर थुंकून टाकावे. यामुळे दातांवरील जंतू नष्ट होतात, पिवळसरपणा कमी होतो आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते.
हळद, मीठ आणि मोहरीचं तेल..
हळद, मीठ आणि मोहरीचं तेल एकत्र करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट दिवसातून दोनदा ब्रश करण्यासाठी वापरल्यास दात अधिक स्वच्छ आणि चमकदार होतात. यामुळे दातांवरील पिवळसर थर हळूहळू कमी होतो.