शिक्षक विसरला मर्यादा! विद्यार्थिनीला केलं प्रपोज, म्हणाला, मला सोडून जाऊ नको नाहीतर मी…


सोलापूर : सध्याच्या काळात विद्यार्थी आणि शिक्षकांमधल्या गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. काही शिक्षकांना आपल्या जबाबदारीचा विसर पडत असल्याच दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

सोलापूर याठिकाणी एका नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. यल्लपा उर्फ सुमित गाडेकर असे या शिक्षकाचे नाव आहे. या मुलीला ‘ तू मला सोडून जाऊ नकोस, अन्यथा मी काहीतरी बरेवाईट करून घेईन’, अशी धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचे मुलीने म्हटले आहे.

याबाबत विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे. शिक्षकाने या अल्पवयीन विद्यार्थिनीशी संवाद साधून प्रपोज केलं. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक सतत पाठलाग करत होता. याबाबत विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

शिक्षकाने हात धरून जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. याबाबत पॉस्को कलम 12 सह भारतीय न्याय संहिता कलम 74, 78, 351 (2) अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. यामुळे शिक्षक म्हणून ही एक धक्कादायक प्रकार आहे.

सध्या अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. पालक आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवतात. पण काही शिक्षक गैरफायदा घेत असल्याच दिसून आलं आहे. काही शिक्षकांना आपल्या सामाजिक जबाबदारीचा विसर पडत असल्याचही दिसून येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!