कराटे शिकायला आलेल्या तरुणीसोबत शिक्षकाने केले धक्कादायक कृत्य, गोड बोलून घरी नेलं अन्..
छत्रपती संभाजीनगर : कराटे शिक्षकाने मुलीला माझी बायको मयत झाली, मला मुलबाळ नाही, तुझ्याशी लग्न करेल, असे सांगून विश्वास संपादीत केला. गोड बोलून घरी नेत बळजबरीने अत्याचार करून गर्भपात केला. या प्रकरणी ५० वर्षीय शिक्षक विरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद शिवाजी घोरपडे (वय ५० रा.आशानगर, गारखेडा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २३ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणी बहिणीकडे राहत असून, नोव्हेंबर २०२१ मध्ये पीडितेला कराटे शिकायचे असल्याने आरोपी मिलिंद घोडपडे याच्या कराटे क्लासमध्ये प्रवेश घेतला.
मिलिंद याने पिडीतेला क्लासचे मॉनिटर केले. यावेळी मिलिंदने पिडीतेशी जवळीक साधायला सुरुवात केली. माझी बायको मयत झाली आहे, मला मुलबाळ नाही, तुझ्याशी लग्न करेल, अशी थाप करत त्याने पिडीतेचा विश्वास संपादीत केला.
गोड बोलून घरी नेल्यावर बळजबरीने दोन वेळेस तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत वारंवार तिच्यासोबत संबंध ठेवले. २०२२ मध्ये गर्भवती राहिल्यानंतर त्याने नोकरीचे आधी बघू, एवढ्यात मूल नको, असे सांगत गर्भपात करायला लावला.
त्यानंतर मिलिंदने पैसा घेऊन सुमारे दोन लाखांची फसवणूक केली. घरी गेल्यावर तु माझ्या लग्नाची बायको नाही, असे त्याने आणि त्याच्या पत्नीने घरातून हाकलुन दिल्याचेही पिडीताने तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरुन संशयित आरोपी मिलिंद घोरपडे याला अटक करण्यात आली असून कोर्टाने त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.