राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! जयंत पवारांनी स्पष्ट सांगितले,…

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अधिक जोर आला होता. आता या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. यावर पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही असे स्पष्ट सांगितले आहे.

याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाबाबत ज्यांच्याबरोबर चर्चा केली ते आज दुर्दैवानं आपल्यात नाहीत, त्यामुळे हा प्रश्न सध्या उद्भवत नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्ण थांबलेली असल्याचं त्यांनी सांगितलं. अजितदादांच्या आग्रहामुळे चर्चा सुरू झाली होती; मात्र ती पूर्ण झाली नाही. अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना म्हणाले, अजितदादांच्या निधनानंतर दोन्हीकडच्या भावना समजून घेणारा नेता सध्या नसल्यामुळे चर्चा थांबलेली आहे आणि यापुढे विलीनीकरण होण्याची शक्यता देखील दिसत नाही, असं पाटील म्हणाले. त्यामुळे मित्र पक्षांना शंका असण्याचं कारण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाला घटकपक्ष असलेल्या उबाठामधून अजून तरी कोणी विरोध केलेला दिसत नाही. पक्ष नेतृत्वानं स्वतःची सेटिंग असणाऱ्या सदस्यांकडून कोणत्याही नावाला विरोध झाल्याची माहिती मागितलेली नाही आणि आमच्या कोणत्याही नावाला विरोध झाला असे वाटत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.