ताकवणे आले कुल मात्र फिरकले नाहीत, आता भीमा कारखान्याच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारच, ताकवणेंचा इशारा
दौंड : तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कथित पाचशे कोटींच्या घोटाळ्यांचे प्रकरण सध्या थांबायचे नाव घेत नाही. याबाबत खासदार संजय राऊत यांनी या कारखान्याचे अध्यक्ष भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर आरोप केले होते.
आमदार राहुल कुल यांना भाजपचेच माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी भष्टाचाराच्या आरोपावरून सातत्याने घेरत आहेत. टाकवणे म्हणाले, भीमा सहकारी साखर कारखाना तथा निराणी ग्रुप शुगर कारखान्यावरील झालेला कथित घोटाळा कागदपत्राच्या पुराव्यानिशी सिद्ध करणार आहे.
या घोटाळ्यांचा पर्दाफाश करणारच आहे. त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. ताकवणे यांनी १५ मे रोजी येणार असून कारखान्याचे अध्यक्ष कुल यांनी मी केलेल्या आरोपाचे खंडन करावे असे आव्हान केले होते.
त्यानुसार ताकवणे हे १५ मे रोजी भीमा पाटस कारखान्यावर आले कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय मधुकाका शितोळे यांना अभिवादन करून पुतळ्यासमोर एक तास बसले. याही वेळी कारखान्याचे अध्यक्ष व कारखान्याचा कोणताही अधिकारी, प्रतिनिधी या ठिकाणी फिरकला नाही.