ऑनलाइन औषधे घेताय? सावधान, पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला एक लाखांचा गंडा
पुणे : ऑनलाईन औषधे विकण्याच्या नावाखाली पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाची १.२३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्याला बंगालमधून बेड्या ठोकण्यात आले आहे.
समीर नरेश रॉय (वय. २१ वर्ष) याला पश्चिम बंगालच्या दिनाजपूर येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खराडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली.
मिळलेल्या माहिती नुसार, ज्येष्ठ नागरिकाने जानेवारी महिन्यात ऑनलाइन पद्धतीने औषधे मागवली होती. औषधांचे कुरियर कुठपर्यंत आले आहे, याबाबतची माहिती घेण्यासाठी त्यांनी संबंधित कंपनीचा संपर्क क्रमांक मिळवला.
त्या क्रमांकावर संपर्क साधला असता चोरट्याने माहिती देण्याच्या बहाण्याने एक लिंक पाठवली लिंक उघडताच बँक खात्यातून 1 लाख 23 हजार 999 रुपये परस्पर वळवण्यात आले. यानंतर आपली फडवणूक झाल्याची लक्षात येताच. ज्येष्ठ नागरिकाने पुणे पोलिसात फिर्याद दिली.
दरम्यान, पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तेव्हा बँक खातेधारक पश्चिम बंगालमधील असल्याचे उघडकीस आले. बँक खात्याशी जोडलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेलची तांत्रिक पडताळणी पोलिसांनी केली.
तेव्हा तांत्रिक तपासात आरोपी रॉय दिनाजपूर परिसरात असल्याची माहिती मिळाली. पुणे पोलिसांच्या पथकाने त्याला दिनाजपूर परिसरातून ताब्यात घेतले.या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.