उन्हाळ्यात केसांची ‘या’ घरगुती उपायांनी घ्या काळजी, केस होणार चमकदार आणि निरोगी..

Hair Care : वाढत्या सूर्यप्रकाशाचा परिणाम केवळ आपल्या त्वचेलाच हानी पोहोचत नाही तर केसांवरही परिणाम होतो. विशेषत: या उन्हाळ्यात काही कामानिमित्त बाहेर धूळ आणि घाणीत जावे लागते. यावेळी धुळीचे कण आपल्या केसांवर जाऊन बसतात.
ज्याप्रमाणे आपण चेहऱ्यासाठी विविध उपाय वापरतो त्याचप्रमाणे केसांची काळजी घेणेही गरजेचे आहे. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे केस अधिक चिकट आणि निर्जीव दिसू लागतात. त्यामुळे लोक महागडी उत्पादने वापरतात, पण काही घरगुती उपाय देखील प्रभावी ठरू शकतात.
यामुळे केस निरोगी आणि चमकदार राहतात. उष्णतेमुळे आणि घामामुळे केस लवकर चिकट होतात. काही वेळा केस धुतल्यानंतरही ते लवकरच चिकट वाटू लागतात, ज्यामुळे लूक खराब होतो. हे टाळण्यासाठी योग्य हेअरकेअर रूटीन आणि घरगुती उपायांचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.
नैसर्गिक उपायांनी केसांना असा मिळवा पोषण..
मेथीचे दाणे केसांसाठी फायदेशीर मानले जातात. २ चमचे भिजवलेले मेथीचे दाणे वाटून पेस्ट तयार करा, त्यात नारळाचे तेल मिसळा आणि केसांना लावा. हा मास्क केस मऊ आणि निरोगी बनवतो तसेच केसगळती कमी करण्यास मदत करतो.
कोरफड नैसर्गिकरित्या केस स्वच्छ आणि चमकदार ठेवते. यासाठी २ टेबलस्पून ताजे कोरफड जेल, १ टेबलस्पून नारळ तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून हेअर मास्क तयार करा. हा मास्क १५-२० मिनिटे केसांना लावून ठेवा आणि नंतर शॅम्पू करा. हा उपाय केसांना पोषण देतो आणि निसर्गसुलभ चमक वाढवतो.
उन्हाळ्यात केसांचे आरोग्य टिकवण्यासाठी नियमित काळजी घ्या..
आठवड्यातून २-३ वेळा शॅम्पू करा, मात्र अति शॅम्पू टाळा.
केसांना जास्त तेल लावणे टाळा, यामुळे ते अधिक चिकट होऊ शकतात.
कोरफड, मेथी किंवा आवळा यासारख्या घटकांपासून ऍलर्जी असल्यास प्रथम पॅच टेस्ट करा.
केसांना नियमितपणे नैसर्गिक पोषण देणारे उपाय अवलंबा.