लहान मुलं सांभाळा, नाशकात एकाच दिवशी घडल्या दोन भयंकर घटना, पोलीसही हादरले…


नाशिक : नाशिक शहरामध्ये अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळकरी मुलींच्या अपहरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

नुकतेच नाशिक शहरामध्ये तीन शाळकरी मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडलेली असताना आता अशातच दोन अल्पवयीन मुलींचेही अपहरण झाल्याची बातमी समोर आली आहे. कालच्या दिवशी शहरातल्या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये दोन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यामधील मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांसमोर अपहरणकर्त्यांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.नाशिक आणि परिसरामध्ये दोन अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आले आहे.

त्यातील एका मुलीचं अपहरण नाशिकमधील पंचवटीतील नवनाथ नगरमध्ये घडली असून दुसरी घटना भगूरमध्ये घडली आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या भागांमध्ये घडल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नाशिकच्या पंचवटीतील नवनाथ नगरमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. दिवसाढवळ्या पंचवटीमध्ये मुलीचे अपहरण झाल्यामुळे नाशिककरांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. सकाळी १०.३० वाजता ती मुलगी घराबाहेर गेली होती. बराच वेळ झाला तरीही ती घरी आली नाही. त्यामुळे तिच्या वडीलांनी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडीलांनी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करताना व्यक्त केला. तर कालच्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील भगूरमध्ये रात्री ११ च्या सुमारास अपहरणाची घटना घडली आहे.

रात्री ११ वाजता ती अल्पवयीन मुलगी कुत्र्याला चपाती देते असं कारण देत ती घराबाहेर पडली. परंतू ती बराच वेळ झाला घरी काही परतली नाही. कुटुंबीयांसह शेजारच्या लोकांनीही तिचा आजूबाजूच्या परिसरामध्ये बराच शोध सुद्धा घेतला. पण ती काही सापडली नाही. शेवटी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. तिच्या अपहरणाचा गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे.

एकाच दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडल्यामुळे सध्या पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत. पोलीस ॲक्टिव्ह मोडवर येताच पोलिसांकडून कारवाईचे चक्रे फिरवले गेली आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!