स्वारगेट बसस्थानक की अवैध धंद्यांचा अड्डा!! आता हादरवणारी माहिती समोर…


पुणे : पुण्यामधील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या स्वारगेट बसस्थानकामध्ये मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेटमधील पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये नराधमाने फसवून २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. यामुळे पुण्यासह राज्यभरामध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे.

विरोधकांनी या घटनेवरून महायुती सरकारला धारेवर धरत पुण्यासारख्या मोठ्या शहरातही महिलांची सुरक्षितता धोक्यात असल्याचा आरोप केला आहे. घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी फरार आरोपी दत्ता गाडे याच्या शोधासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

तसेच हा आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जबरी चोरीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, स्वारगेटसारख्या मध्यवर्ती आणि गर्दीच्या भागात अशा प्रकारची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आश्वासन दिले जात असले, तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या घटनेत पीडितेला शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. घटनेनंतर बसच्या दरवाज्याबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, बस चालकाने बस लॉक केली होती. मात्र, गाडीचा एअर प्रेशर उतरल्याने दरवाजा आपोआप उघडला असण्याची शक्यता आहे. तांत्रिक विभागाने सांगितले की, गाडी बंद असताना आणि एअर प्रेशर कमी झाल्यास लॉक केलेला दरवाजा उघडू शकतो.

दरम्यान, घटनेनंतर काही राजकीय कार्यकर्त्यांनी बसस्थानकाची पाहणी केली असता, धक्कादायक बाबी समोर आल्या. अनेक धूळखात पडलेल्या एसटी बसमध्ये मद्याच्या बाटल्या, कंडोमच्या पाकिटांचा खच आढळून आला. यावरून बसस्थानकातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हे बसस्थानक आहे की अवैध धंद्यांचा अड्डा?, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!