भाजप नेत्याच्या निवासस्थानी बेवारस संशयास्पद बॅगने खळबळ ;सुरक्षा यंत्रणा सतर्क

पुणे:राज्यातील महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना मंत्री नितेश राणे यांच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील सुवर्णगड बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिसरात बंदोबस्त वाढवला असून संशयास्पद बॅगची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. नेमकी ही बॅग कोणाची आहे याची चौकशी आता सुरू आहे.
दरम्यान पोलीस ही बॅग नेमकी कुणाची आहे, ती तिथे कशा उद्देशाने ठेवण्यात आली, याचा तपास करत आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासानंतरच ही निष्काळजीपणा की घातपाताचा प्रयत्न, हे स्पष्ट होणार आहे.

सध्या बॅगेत नेमके काय आहे, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी, कोणताही धोका टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही बॅग भाजप नेत्याच्या घराबाहेर आढळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.