संशयालाच हवा!अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर DGCA च्या विरोधात गुन्हा दाखल होणार?

मुंबई: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात हा नियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावरून तीन वेळा पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते.त्यांनी व्हीएसआर कंपनीवर बोटही उचललं. आता रोहित पवारांसह आमदार अमोल मिटकरी हे डीजीसीएच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात संशयाची सुई व्हिएसआर कंपनीकडे आहे. यावर तात्काळ कारवाई करणे गरजेचे असताना देखील विलंब होत आहे त्यामुळे आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी डीजीसीएच्या विरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करणार आहे.कंपनीवर तत्काळ कारवाई करणं अपेक्षित असताना, कारवाईला उशीर केल्याने आणि कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना कारवाई न केल्याने गुन्हा नोंद करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यांचा हा अपघात आता घातपात असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार ज्या विमानात बसले होते ती व्हीएसआर कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्लॅकलिस्टमध्ये देखील आहे. तरी देखील त्या विमान कंपनीवर कारवाई अद्याप का होत नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान बारामतीजवळ कोसळलं आणि त्यात अजित दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. मुंबईवरून बारामतीला जात असताना अजित पवारांचे विमान लँडिंगच्या आधी कोसळले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. त्यांचा हा अपघात घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.