सस्पेन्स संपला! मुंबईत शिंदेंचा महापौर होणार? भाजपची माघार, नेमकी बोलणी काय झाली?

मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर बहुचर्चीत अशा मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? याबाबत सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळताना दिसत आहे. महापौर पदावरून भाजप एक पाऊल मागे आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत शिंदेंचा महापौर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेत भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला असला तरी स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतकं संख्याबळ भाजपकडे नाही. अशा स्थितीत २९ नगरसेवक असणारे एकनाथ शिंदे किंग मेकरच्या भूमिकेत आले आहेत. त्यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर दावा सांगितला आहे. शिंदेंच्या या मागणीनंतर भाजपची अडचण निर्माण झाली. यानंतर भाजपनं
महापौर पद शिंदे गटाला देण्याची भाजपनं तयारी दर्शवली आहे.


मुंबईच्या महापौदासाठी भाजप एक पाऊल मागे आल असलं तरी तिजोरीच्या चाव्या भाजप आपल्याकडे ठेवणार आहे. शिंदे गटाला महापौर पद आणि स्थायी समिती सभापती पद भाजपाकडे राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महापालिका निकाल लागल्यापासून मुंबईत कुणाचा महापौर बनणार? याबाबत जो सस्पेन्स निर्माण झाला होता. आता हा सस्पेन्स संपल्याचं दिसून येत आहे.
मुंबईच्या महापौर पदावरून भाजप एक पाऊल मागे आल्याची माहिती आहे. भाजप मुंबईचं महापौर पद एकनाथ शिंदे यांना देणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंना वाटाघाटीत यश आलं असून अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांकडून एकमत झाल्याची माहिती समोर आहे.
