सस्पेन्स वाढला! मुंबईचा महापौर कोण होणार? पंतप्रधान मोदींच्या विधानाने खळबळ, मुंबईत आता…

मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा मोठ्या दणक्यात विजय झाला आहे. आता महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले,मुंबई हे जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर आहे. त्या शहरातही जनतेने भाजपाला पहिल्यांदाच ऐतिहासिक आणि विक्रमी मतं दिली आहेत. भाजपाचा मुंबईत विजय होत आहे,पण तो विजय काझिरंगामध्ये साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात बहुसंख्य शहरात लोकांनी भाजपालाच सेवेची संधी दिली आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.


दरम्यान दोन दिवसांअगोदर महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत महापौर आणि नगरसेवक पदाच्या निवडणुका झाल्या. संपूर्ण देशात भाजपा हा सर्वांचा आवडता पक्ष म्हणून समोर येत आहे. गेल्या एक ते दीड वर्षांपासून लोकांचा भाजपावरील विश्वास वाढत आहे. नुकत्याच झालेल्या बिहार मधील निवडणुकीत ही भाजपला मोठे यश मिळालं.
मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुकीवर थेट पंतप्रधान मोदींनी आसाम राज्यात केलेल्या विधानांची चर्चा होत आहे.
सध्या भाजपा आणि शिवसेना यांच्यात महापौरपदाच्या निवडीवरून चर्चा सुरू आहे. असे असतानाच मोदी यांनी थेट आसाममध्ये मुंबईचा उल्लेख केल्याने भाजपाच्या नेत्यांचेही महापौरनिवडीकडे लक्ष आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
