कर्नाटकमध्ये नव्या मुख्यमंत्र्याबाबत सस्पेन्स वाढला, दिल्लीत घडामोडींना वेग..

कर्नाटक : कर्नाटकमध्ये सध्या मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांची नावे समोर आल्यानंतर या दोन्ही प्रमुख नेत्यांना केंद्रीय नेतृत्वाने चर्चेसाठी दिल्लीत बोलावले होते.
यामुळे दोघांपैकी एकाचे नाव फायनल केले जात आहे. काँग्रेसचे कर्नाटकातील केंद्रीय निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी रात्री दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी पक्षाच्या आमदारांशी चर्चा करणाऱ्या तीन केंद्रीय निरीक्षकांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना माहिती दिली. यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत कर्नाटकच्या आमदारांच्या मताचा अहवाल निरीक्षकांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना सादर केला आहे. यामध्ये आमदारांचे मत जाणून घेतले जात आहे.