तरुणीशी लगटं गळ्याशी ! जीव देण्याची धमकी दिल्याने तरुणीची आत्महत्या , तरुणावर गुन्हा दाखल …!
उरुळी कांचन : माझ्याशी लग्न कर नाहीतर जीव देतो म्हणून तरुणाने विषारी औषध घेतल्याचा व्हिडिओ बनवत तो तरुणीच्या मोबाईलवर पाठवल्याने भयभीत झालेल्या तरुणीने लॉजमध्ये पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार वडकी (ता. हवेली) येथे नुकताच घडला आहे.या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.
मेहक सुनिल शिंदे (वय-२१, रा. कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. तर अक्षय अरूण जोरे (रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे) याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेकची आई शोभा सुनिल शिंदे (५३, रा. कोंढवा) यांनी
लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय व महेक या दोघांची एकमेकांशी ओळख होती. अक्षय यास महेक हिच्याशी लग्न करावचे होते. दरम्यान त्याने रविवारी (ता. १६) माझ्याशी लग्न कर नाही तर मी जीव देतो असे म्हणत स्वतः विषारी औषध पिल्याचा एक व्हिडीओ तयार केला. तो व्हिडिओ त्याने महेकला पाठवला. तिने जेव्हा हा व्हिडिओ बघीतला तेव्हा महेक घाबरून गेली.
अक्षयला काही झाली तर आपल्यावर कारवाई याची भिती महेकला वाटू लागली. शेवटी याच भितीतून महेकने वडकी येथील हॉटेल विजयमधील छताच्या पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.