Suraj Chavan : सूरज चव्हाणने बिग बॉस गाजवलं! ट्रॉफी जिंकल्यानंतर किती पैसे मिळाले? जाणून घ्या…
Suraj Chavan : बिग बॉस मराठी सीझन ५च्या विनर ट्रॉफीवर सूरजने आपले नाव कोरले आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचे वागणे, बोलणे या सगळ्याचच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नावं कोरले आहे.
बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणवर पैशांचा पाऊस पडला आहे. प्राइजमनीसह त्याला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख याने सूरज चव्हाणला बिग बॉसची मानाची ट्रॉफी दिली. सूरजला ट्रॉफी देताना रितेश देशमुख प्रचंड खूश दिसला. ट्रॉफी दिल्यानंतर त्याने सूरजबरोबर सेल्फी देखील काढला.
सूरजला १४ लाख ६० हजाराचा प्राइज मनी मिळाला. जो त्याने टास्क खेळून मिळवला होता. प्राइज मनीबरोबर मानाची ट्रॉफी सूरजला मिळाली.त्याचप्रमाणे पु.ना.गाडगीळ आणि सन्स लिमिटेड तर्फे १० लाखांचे विशेष गिफ्ट देण्यात आलं. सूरज चव्हाण एकूण २४ लाख रुपये घरी घेऊन गेला. Suraj Chavan
तसेच Tunwal E Motors limited तर्फे बाईक सूरजला देण्यात आली. त्याचप्रमाणे सूरज चव्हाणला नवा सिनेमा देखील मिळाला. केदार शिंदे यांनी बाईपण भारी देवानंतर झापूक झुपूक या सिनेमाची घोषणा केली आहे. ज्याचा हिरो स्वत: सूरज चव्हाण असणार आहे.
निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या.
टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सूरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप ३ मध्ये धडक दिली. यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप २ मध्ये स्थान मिळवलं. अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता केले.