सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळणार, बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ…

पुणे : सुप्रिया सुळे या केंद्रात लवकरच मंत्री होतील असा दावा वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबडेकरांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र आले आहे. म्हणजे त्यांचे विलीनीकरण झाले आहे. अजित पवारांच्या साथीने शरद पवारांनी भाजप सोबत जाण्याचे पहिले पाऊल टाकले. असे त्यांनी भाकीत केले आहे.

त्यामुळे लवकरचं सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये, असे आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवाय राजकीय वर्तूळात याचे वेगवेगळे अर्थ ही लावले जात आहेत. काँग्रेसने आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे ही ते म्हणाले. ठाकरे शिवसेनेच्या पोटात राज ठाकरे आहेत. त्यामुळे राज ठाकरे ज्या-ज्या पक्षांसोबत युती करणार असेल त्या पक्षांसोबत काँग्रेसने जाऊ नये.

काँग्रेसने हे पाळलं नाही तर महाराष्ट्राप्रमाणे देशभरात त्यांचं अस्तित्व कमी होईल, असा इशारा ही आंबेडकरांनी थेट काँग्रेसला दिला. मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आघाडी केली आहे असं आंबेडकर म्हणाले. इतर महापालिकांमध्ये ही भाजप वगळता इतर पक्षांशी आघाडी करण्याचं काम सुरू आहे.

दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. वंचितने मुंबई महापालिकेत काँग्रेस बरोबर आघाडी केली आहे. या आघाडीला मोठं यश मिळेल अशी अपेक्षा आंबेडकरांना आहे.
